Friday, April 2, 2010

मी आणि माझ्या कविता..!


जन्माला आल्यानंतर येणा-या प्रत्येक हुंदक्याबरोबर,श्वासाबरोबर सुरु होतं आयुष्य,
त्या क्षणापासून सुरुवात होते ती अनुभूतींना अन घडत जातो माणूस.
या अनुभवांचे,या भावनांचे साक्षीदार असतो आपण प्रत्येक जण.भोगणं,सोसणं,तडफडणं,चरफडणं,तळमळ,कळकळ,अस्वस्थता,दु:ख,पराकोटीची निराशा आणि कधी उत्साह,जोम,हुरुप,आनंद,यश,समाधान,सुख अगदी मोक्ष सुध्दा.अशा कित्येक आरसपाणी अनुभुतींचा सारीपाट.यातच मग कुठेतरी मनाच्या तळाशी अगदी आतून येतात संवेदना.ज्यांच्यात असतं सामर्थ्य.ते सगळं व्यक्त करण्याचं,शोधण्याचं,सार आपल्या जगण्याचं,हसण्याचं.
अशीच हसत भिजून येते कविता.
ओलावलेल्या पापणीतून उतरुन येते कविता..!

फुल.....!


माझी पहिली कविता फुल..


नुकतच कळीचं..
झालेल ते फुल आनंदाने
डोलत होतं.....
किती सुंदर
आहे हे जग
म्हणुन आंनदाने गात होतं..
फार वाइट वाटलं मला....
कारण.....
त्याचा तो आनंद
क्षणभंगुर होता....
कारण........
थोडयाच वेळाने
माळी त्याला तोडणार होता..!!!!!

                         रेखा....

स्वप्नातली गोड परी ...!!!


काल रात्रीच्या स्वप्नात
भूतलावरची.......
स्वप्नासारखी गोड परी
स्वप्नात मला भेटून गेली
जातांना मात्र खूप काही सांगून गेली

माझ्यासारखच तिलाही
खूप बोलायच होतं
खूप काही ऐकून
खूप छान जगायच होतं

तिच्या जगण्यालाही
माझ्यासारखाच अर्थ होता
आत्तापर्यंतच्या
सा-या ख-या खोट्याचा
तो कबुलीजबाब होता

तिने जातांना मात्र
मला जागं केलं होतं
एका स्वप्नाळू फुलराणीला
पुन्हा फुलांच्या विश्वात नेल होतं

----रेखा